मुंबईत दादागिरी चालणार नाही: चिदंबरम
Posted on Monday, February 01, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
मुंबईवर संपूर्ण देशाचा हक्क असून तिथे कुणाचीही दादागिरी मंजूर केली जाऊ शकणार नाही. पाकिस्तानी आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मुंबईत खेळू शकतील आणि त्यांना पूर्ण सुरक्षा पुरविली जाईल असे प्रतिपादन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे. मराठी विरुध्द अमराठी वाद सध्या चरम सीमेवर असतानाच या संदर्भात प्रथमच चिदंबरम यांनी वक्तव्य दिले आहे.चिदंबरम म्हणाले, की मुंबई संपूर्ण देशाची असून देशातील कुणीही व्यक्ती मुंबईत राहण्यास आणि तिथे नोकरी करण्यास स्वतंत्र आहे. या विषयावर कुणाचीही दादागिरी चालू शकत नाही. महाराष्ट्र सरकार अशा प्रकारच्या विरोध करणा-यांवर कारवाई करण्यास सक्षम असून जर राज्याने यासंदर्भात केंद्राचा सल्ला मागितला तर आम्ही देऊ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाक आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू मुंबईत क्रिकेट खेळू शकतात आणि राज्य सरकार त्यांना पुरेशी सुरक्षा देण्यात सक्षम आहे, असेही चिदंबरम यांनी सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "मुंबईत दादागिरी चालणार नाही: चिदंबरम"
Post a Comment