हेडलीचा नोव्हेंबरमध्ये मुंबई दौरा!
Posted on Monday, February 01, 2010 by maaybhumi desk
मुंबई
अमेरीकन दहशतवादी डेव्हीड हेडली 26/11 नंतरही भारतात पुढील दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यासाठी आणि दिल्लीत लश्कर-ए-तैयबाचे ठिकाण बनविण्यासाठी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतात येण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यापूर्वीच शिकागोत अमेरीकन एजन्सी एफबीआयने त्याला अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.गुप्तचर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर लश्करच्या निशाण्यावर भारतातील यहुदी ठिकाण होती. त्यामुळे हेडली नोव्हेंबरमध्ये नव्या हल्ल्याच्या तयारीसाठी भारतात येणार होता, अशी माहिती भारताविरोधात हेडली आणि लश्करच्या कटाचा तपास करीत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हेडलीच्या भारतीय मित्राच्या चौकशीतून समोर आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "हेडलीचा नोव्हेंबरमध्ये मुंबई दौरा!"
Post a Comment