संघाने आम्हाला अस्मिता शिकवू नयेः उध्‍दव

Posted on Monday, February 01, 2010 by maaybhumi desk

मुंबई

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाने मुंबईतील स्‍थानिकत्वाच्‍या मुद्यात हस्‍तक्षेप न करणेच योग्य ठरणार असून त्यांनी हिंदीचा प्रचार दक्षिण भारतात करावा. शिवसेनेला अस्मिता शिकविण्‍याचा प्रयत्न करू नये, असा खोचक सल्‍ला शिवसेना कार्याध्‍यक्ष उध्‍दव ठाकरे यांनी संघाला दिला आहे.

मुंबईत येऊन राहण्‍याचा आणि उदरनिर्वाहासाठी येथे रोजगार मिळविण्‍याचा सर्वांना अधिकार असून मुंबईत उत्तर भारतीयांवर अन्‍याय होत असल्‍यास संघ स्वयंसेवकांनी त्यांचे रक्षण करावे असा आदेश रास्‍वसंघाने दिला असून त्यास शिवसेनेने कठोर शब्‍दात प्रत्युत्तर दिले आहे.

संघाने हिंदीचा पुळका बाळगण्‍याची गरज नाही. आणि तो बाळगायचा असल्‍यास दक्षिण भारतात हिंदीचा प्रचार करून दाखवावा असा सल्‍ला उध्‍दव यांनी दिला आहे.

हे देखिल वाचाः 

भैय्यांच्‍या रक्षणासाठी 'संघ दक्ष'
...तर आयपीएल होऊ देणार नाहीः बाळासाहेब1
वयाने थकलो विचारांनी नाहीः बाळासाहेब
भिवंडीत शिवसेनेचा विजयी झेंडा


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "संघाने आम्हाला अस्मिता शिकवू नयेः उध्‍दव"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner