पाकशी द्विपक्षीय चर्चा बंदच: भारत

Posted on Thursday, February 18, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तानात द्विपक्षीय चर्चा बंद असून परराष्‍ट्र सचिवस्तरावर होणारी चर्चा केवळ द्विपक्षीय चर्चा करण्‍याच्‍या दृष्‍टीने योग्य वातावरणाची पडताळणी करण्‍यासाठी होणारी भेट असल्‍याचे परराष्‍ट्र मंत्री एस.एम. कृष्‍णा यांनी जाहीर केले आहे. दोन्‍ही देशांदरम्यान होणारी ही भेट द्विपक्षीय चर्चा समजण्‍याची चूक करू नये असा सल्‍लाही त्यांनी माध्‍यमांना आणि विरोधी पक्षांना दिला.

पाक जोपर्यंत आपल्‍या भूमीवरून भारतविरोधी कारवाया करणा-या दहशतवादी संघटनांचा नायनाट करत नाही तोपर्यंत दोन्‍ ही देशांमध्‍ये द्विपक्षीय चर्चा बंदच राहील असे ठामपणे सांगताना परराष्‍ट्र मंत्री कृष्णा 25 फेब्रुवारी रोजी होणारी भेट ही केवळ दोन्‍ही देशांनी दहशतवादाविरोधात केलेल्‍या कारवाईची पडताळणी करणे आणि पुढील काळातील चर्चेच्‍या संधी शोधणे यासाठीची भेट असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "पाकशी द्विपक्षीय चर्चा बंदच: भारत"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner