भारत चर्चेबाबत गंभीर नाही: सईद

Posted on Thursday, February 18, 2010 by maaybhumi desk

इस्लामाबाद
भारताती जर पाकिस्तान सोबत सुसंवाद हवा असेल तर काश्मीर मुद्दा हाच चर्चेचा प्रमुख मुद्दा असल्‍याचे मान्‍य करावे लागेल त्याशिवाय दोन्‍ही देशात संवाद साध्‍य होऊ शकणार नाही. मात्र पाकशी चर्चा करण्‍यास भारत फारसा गंभीर दिसत नसल्‍याचा आरोप मुंबई हल्‍ल्‍याचा प्रमुख सुत्रधार हाफीज सईद याने केला आहे.

अल-जजीरा या वृत्त वाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत सईदने सांगितले, की दोन्‍ही देशात चर्चा करण्‍यासाठी भारताने कधीही गांभीर्य दाखविले नाही. दोन्‍ही देशातील चर्चेचा मुख्य मुद्दा काश्‍मीर असल्‍याचे जोपर्यंत भारत मान्‍य करीत नाही. तोपर्यंत दहशतवादी कारवाया सुरूच राहतील.

सईद जमात उद दावा व लश्कर ए तैयबा या संघटनेशी संबंधित असून त्याच्‍यावर मुंबई हल्‍ल्‍याचा कट रचून हल्‍ला घडवून आणल्‍याचा आरोप आहे. या हल्‍ल्‍यात सुमारे 166 लोक मारले गेले होते.

सईदने मात्र आपल्‍यावरील हल्‍ल्‍याचा इन्‍कार केला असून आपण कसाबला ओळखतही नाही. तो पाकिस्‍तानी असल्‍याचे आपल्‍याला भारतीय माध्‍यमांकडून कळल्‍याचा दावा त्‍याने केला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "भारत चर्चेबाबत गंभीर नाही: सईद"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner