कृष्‍णा यांच्‍या वक्तव्‍याने पाक चिंतित

Posted on Thursday, February 18, 2010 by maaybhumi desk

इस्लामाबाद
पाकसोबत 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार असलेली सचिवस्‍तरीय बैठक द्विपक्षीय चर्चा नसून केवळ काही मुद्यांवरती केंद्रित राहील भविष्‍यातील शक्यता तपासून पाहणारी ही बैठक ठरेल अशा परराष्‍ट्र मंत्री एस.एम. कृष्णा यांच्‍यावक्तव्‍यानंतर पाकिस्तानने तीव्र नाराजी व्‍यक्त केली असून या चर्चे संदर्भात भारताने आपली बाजू स्‍पष्‍ट करावी अशीमागणी केली आहे.

पाकिस्तानी परराष्‍ट्र मंत्रालयाने या संदर्भात दिलेल्‍या वक्तव्‍यात म्हटले आहे, की भारतीय मंत्र्यांच्‍या वक्तव्‍यावर पाकिस्तानी परराष्‍ट्र मंत्र्यांनी चिंता व्‍यक्त केली असून भारताचे उद्दीष्‍ट कळण्‍यापलीकडचे आहे. चर्चेपूर्वीच त्‍यातून काय निष्‍पन्न होईल याबद्दलचे भाकीत आधीच वर्तविणे चुकीचे असून त्याच्‍या मर्यादा निश्चित करणेही चुकीचे आहे. या संदर्भात भारत सरकारने स्‍पष्‍टीकरण द्यावे अशी मागणी केली असल्‍याची माहितीही प्रवक्त्‍याने दिली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "कृष्‍णा यांच्‍या वक्तव्‍याने पाक चिंतित"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner