गुप्तचरांकडून सूचना मिळाली होती- भुजबळ

Posted on Saturday, February 13, 2010 by maaybhumi desk

मुंबई

राज्यात दहशतवादही हल्ला होईल, अशी सूचना गुप्तचर संस्थांनी आम्हाला दिली होती. परंतु स्फोटे नेमके कुठे होईल याची माहिती मिळाली नव्हती, अशी कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.


पुण्यात झालेल्या बॉंबस्फोटाबाबत भुजबळ यांना विचारले असता ते म्हणाले,' गुप्तचर संस्थांनी दहशतवादी हल्ला होणार असल्याची सूचना दिली होती. परंतु हा हल्ला कुठे होईल आणि केव्हा होईल, ही माहिती दिली नव्हती.'

पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून दहशतवादी लवकरच सापडतील, असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "गुप्तचरांकडून सूचना मिळाली होती- भुजबळ"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner