स्फोटात पाच ते सात किलो आयईडीचा वापर

Posted on Saturday, February 13, 2010 by maaybhumi desk

पुण्यात जर्मन बेकारीत झालेल्या शक्तीशाली बॉंबस्फोटात पाच ते सात किलो आयईडीचा (Improvised Explosive Device) वापर करण्यात आल्याचा निष्कर्ष एटीएसने काढला आहे. या स्फोटात दहा जण ठार झाले असून 40 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.


जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात कमीत कमी पाच ते सात किलो आयईडीचा वापर झाला आहे. यामुळे या बॉंबस्फोटाची सुई प्राथमिक स्तरावर इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडे जात आहे. हा स्फोट बेवारस बॅग उघडल्यामुळे झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्‍थळी आणखी एक बेवारस बॅगही आढळून आली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "स्फोटात पाच ते सात किलो आयईडीचा वापर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner