बॉम्बस्फोटाबाबत पुण्याचे आयुक्तच बेफिकीर

Posted on Monday, February 15, 2010 by maaybhumi desk

पुणे

बॉम्बस्फोट होऊन दोन दिवस उलटले तरी पुणे पोलिसांच्या हाती काहीही लागलेले नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे पुण्याचे पोलिस आयुक्त सत्यपालसिंह यांनाही त्याची फारशी फिकीर नसल्याचे आजच्या पत्रकार परिषदेवरून जाणवले.
आमचा तपास योग्य मार्गाने सुरू आहे. हाती ठोस काही असल्याशिवाय आम्ही काहीही सांगणार नाही, असेच ते सांगत राहिले. घटनेचे गांभीर्य त्यांच्या आजच्या बोलण्यावरून तरी अजिबात जाणवले नाही.

आयुक्तांनी आज पत्रकार परिषद घेण्याचे कारण काय हेच कळले नाही. पत्रकारांच्या प्रश्नाला टोलवाटोलवीची उत्तरे देताना जबाबदार पदावरच्या या अधिकार्‍याचा बेफिकिरपणाचा अधिक जाणवत होता. 'हसत खेळत' पत्रकार परिषद घेत, पत्रकारांच्या 'टोप्या'ही त्यांनी उडवल्या. पण कोणतीही माहिती उघड होणार नाही, याची दक्षताही घेतली.

या घटनेत एकापेक्षा जास्त संशयित असू शकतात. कोणत्याही संघटनेचा हात असू शकतो. पण आमचा तपास
योग्य मार्गावर चालला आहे, असे उत्तर त्यांनी या तपासाच्या प्रगतीसंदर्भात दिले. शिवाय 'तपासासंदर्भात
प्रसारमाध्यमांना सर्व काही सांगायला मी काही बांधिल नाही,' असेही सुनावले.

या घटनेचा तपास चार पथकांकडून केला जातो आहे. त्या सर्वांत एकवाक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली.

शिवाय या घटनेतील नऊ मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले आहेत. तीन जणांची प्रकृती गंभीर असून त्यात एक सुदानी नागरिक असल्याचे ते म्हणाले.

click hereसत्यपालसिंह म्हणाले,

  • फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आज मिळेल. उद्या मिळेल. कदाचित परवाही मिळेल.

  • आमच्यापेक्षा तुमच्याकडे जास्त माहिती असते. या घटनेत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती तुमच्याकडे आहे का? त्याचे फोन नंबर, पत्ता आम्हाला द्या. पत्रकारांचेही बर्‍याच लोकांशी संबंध असतात. (या हल्ल्यात कोणाचा सहभाग आहे, अशी पृच्छा केल्यानंतर मिळालेले उत्तर.)
  •  माझी स्मरणशक्ती अतिशय शार्प आहे. त्यामुळे मी तसे काही बोललो नव्हतो. (संशयितांची स्केचेस आज तयार होणार या त्यांच्या एका विधानाची आठवण करून दिल्यानंतरची मल्लिनाथी)
  • काही लोक कायद्याच्यावर असतात. (जखमींकडे कसलीही चौकशी करू नका असे माध्‍यमांना सांगितल्‍यानंतर राजकारणी जातात त्याचे काय असे विचारले असता. पोलीस आयुक्तांचे मत प्रदर्शन)

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "बॉम्बस्फोटाबाबत पुण्याचे आयुक्तच बेफिकीर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner