'प्लॅन' लश्करचा, अंमलबजावणी 'मुजाहिदीन'ची?
Posted on Monday, February 15, 2010 by maaybhumi desk
पुण्यात शनिवारी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या योजनेची आखणी लष्कर ए तोयबाने केली आणि त्याची अंमलबजावणी इंडियन मुजाहिदीन या संघटनेने केली असावी असा कयास पोलिसांनी बांधला आहे.
जर्मन बेकरीमध्ये पेरण्यात आलेला बॉम्ब रिमोट कंट्रोल किंवा मोबाईल फोनद्वारे उडविण्यात आला.
स्फोटाच्या ठिकाणी टायमर सापडलेला नाही. त्यामुळे तो टाईम बॉम्ब नव्हता. प्रत्यक्ष स्फोट घडविण्यात लष्कर ए तोयबाचा सहभाग असणे कठीण दिसते आहे. कारण रिमोट कंट्रोलद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याचे प्रकार या आधी फक्त काश्मीरमध्ये आढळून आले आहेत.
या कटाची आखणी तोयबाने केली आणि इंडियन मुजाहिदीनने ही योजना तडीस नेली असावी. या दोन्ही संघटनांमध्ये डेव्हिड हेडलीने मध्यस्थ म्हणून भूमिका बजावलेली असू शकते. एफबीआयने अमेरिकेतील शिकागो विमानतळावर गेल्या सप्टेंबरमध्ये त्याला अटक केली आहे. या हेडलीनेच २६-११ चा मुंबई हल्ल्याची योजना आखण्यात आणि तिची अंमलबजावणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हेडलीने पुण्यात येऊन ओशो आश्रमाजवळच्याच एका हॉटेलमध्येही वास्तव्य केले होते. त्याचे हे हॉटेल जर्मन बेकरीपासूनही अगदी जवळ आहे.
अमेरिकी सरकारने हेडलीच्या पुण्यातील वास्तव्यासंदर्भात भारत सरकारला माहिती दिली होती. शिवाय पुणे हे संभाव्य लक्ष्य असू शकेल अशी कल्पनाही दिली होती. म्हणूनच या हेडलीची चौकशी करण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे.
हेडलीने एफबीआयला दिलेल्या माहितीत भटकळ बंधूंचीही नावे घेतली असल्याचे समजते. रियाझ व इकबाल
भटकळ हे दोघे भाऊ इंडियन मुजाहिदीनच्या भारतातील प्रमुख सुत्रधारांपैकी एक आहेत. याच संघटनेचा प्रसिद्धी प्रमुख मन्सूर पीरभायला पोलिसांनी २००८ मध्ये अटक केली होती. त्याने दिलेली माहिती आता पुण्याचे दहशतवादविरोधी पथक तपासून पहात आहे. दिल्ली व अहमदाबादमध्ये २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा इशारा देणारे मेल या पीरभायनेच पाठवले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "'प्लॅन' लश्करचा, अंमलबजावणी 'मुजाहिदीन'ची?"
Post a Comment