कांगारूंना खेळू देणार नाहीच: शिवसेनाप्रमुख
Posted on Monday, February 15, 2010 by maaybhumi desk
ऑस्ट्रेलियात भारतीयांना होत असलेल्या मारहाणीनंतरही जर आपण त्यांच्याशी क्रिकेट खेळू लागलो तर हा आपला दुबळेपणाच म्हणावा लागेल. असे सांगतानाच कांगारूंना आयपीएलमध्ये भारतात खेळू न देण्याच्या भूमिकेवर आपण ठाम असल्याचा पुनरूच्चार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केला आहे. मी थकलो असलो तरीही अद्याप रिटायर झालो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काही दिवसांपूर्वी कृषीमंत्री शरद पवार यांनी या प्रकरणी बाळासाहेबांची भेट घेतल्यानंतरही शिवसेनेने भूमिका न बदलल्याने राज्य सरकारसमोर पुन्हा नवीन प्रश्न उपस्थित उभे राहण्याची शक्यता आहे.
लेबले:
breaking news,
cricket,
current news,
indian news,
IPL,
latest news,
maharashtra news,
Mumbai,
news,
pune,
shiv sena
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "कांगारूंना खेळू देणार नाहीच: शिवसेनाप्रमुख"
Post a Comment