पुणे स्फोटः जखमीचा मृत्यू, बळींची संख्या दहावर
Posted on Tuesday, February 16, 2010 by maaybhumi desk
पुण्यातील जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या तिघांपैकी एका तरुणाचा अखेर सोमवारी मध्यरात्री मृत्यू झाला असून येथील बुधराणी हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान तो मरण पावला आहे. अभिषेक सक्सेना असे या तरुणाचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील लखनऊ शहरातील आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त सतपाल सिंग यांनी या संदर्भात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शनिवारी सायंकाळी
यहुदी धर्माच्या छाबड हाऊस आणि ओशो आश्रमा जवळ असलेल्या जर्म बेकरीत जोरदार स्फोट झाला होता. या स्फोटात नऊ जण जागीच ठार तर 57 जण जखमी झाले होते. जखमींपैकी तिघांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे पोलीस आयुक्त सतपाल सिंह यांनी कालच जाहीर केले होते. अखेर त्यापैकी एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता 10 झाली आहे.
लेबले:
breaking news,
current news,
FBI,
german beckary,
maharashtra news,
osho aashram,
pune,
pune blast
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "पुणे स्फोटः जखमीचा मृत्यू, बळींची संख्या दहावर"
Post a Comment