माओवाद्यांच्‍या हल्‍ल्‍यात 24 जवान शहीद

Posted on Tuesday, February 16, 2010 by maaybhumi desk

कोलकाता

पश्चिम बंगालच्‍या प. मिदनापुर जिल्‍ह्यातील सिलदा भागात नीमलष्‍करी दलाच्‍या एका शिबिरावर माओवाद्यांनी केलेल्‍या हल्‍ल्‍यात ईस्टर्न फ्रंटियर रायफलचे (ईएफआर) सुमारे 24 जवान शहीद झाले आहेत. हल्‍ला करण्‍यापूर्वी माओवाद्यांनी या शिबिरावर आग लावून दिल्‍याचेही सुत्रांनी सांगितले.

या घटनेनंतर सुमारे 40 माओवाद्यांनी पुन्‍हा धर्मपुर जिल्‍ह्यातील एका सीआरपीएफ शिबिरावरही हल्‍ला केला. मात्र जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्‍या कारवाईनंतर नक्षलवादी पळून गेले.

जिल्‍हाधिकारी एन.एस. निगम यांनी दिलेल्‍या माहितीनुसार मोटरसायकल व इतर वाहनांवर आलेल्‍या आणि
अत्‍याधुनिक शस्‍त्रांस्‍त्रांनी सज्ज असलेल्‍या माओवाद्यांनी सिलदा शिबिरावर हल्‍ला करण्‍यापूर्वी सायंकाळी साडे पाच वाजेच्‍या सुमारास भूसुरूंगाचा स्‍फोट करून गोळीबारास सुरूवात केली. हल्‍ल्‍याच्‍या वेळी ईएफआरचे 51 जवान व अधिकारी शिबिरात होते.

दरम्‍यान, माओवादी नेता किशनजी याने हल्‍ल्‍याची जबाबदारी स्‍वीकारली असून जोपर्यंत केंद्र सरकार
नक्षलवादाविरोधात सुरू करण्‍यात आलेले अभियान थांबवत नाही तोपर्यंत हल्‍ले सुरूच राहतील असे त्‍याने जाहीर केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "माओवाद्यांच्‍या हल्‍ल्‍यात 24 जवान शहीद"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner