स्फोटात RDX व अमोनियम नायट्रेटचा वापर
Posted on Tuesday, February 16, 2010 by maaybhumi desk
पुण्यातील जर्मन बेकरीत घडवून आणण्यात आलेल्या स्फोटाचा फोरेन्सिक अहवाल समोर आला असून या स्फोटात आरडीएक्स, अमोनियम नायट्रेट व पेट्रोलियम हायड्रोकार्बन ऑईलचा वापर करण्यात आला असल्याची माहिती पोलीस आयुक्त सतपाल सिंह यांनी दिली आहे. या शिवाय दोघांना या संदर्भात अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे स्फोट प्रकरणाचा तपास करीत असलेल्या एटीएस पथकाने आतापर्यंत स्फोटातील अनेक बाबी उलगडण्यात यश मिळवले असून काही दिवसातच या संदर्भात मोठा खुलासा करू अशी माहिती आयुक्त सिंह यांनी दिली. स्फोटात आताच कुणाचा हात आहे हे सांगणे कठीण आहे. मात्र या प्रकरणी सोमवारी रात्री दोघांना ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही जणांचा शोध सुरू आहे. सुत्रधार लवकरच आमच्या ताब्यात असेल असा दावाही त्यांनी केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "स्फोटात RDX व अमोनियम नायट्रेटचा वापर"
Post a Comment