एक पिज्जा = 12000 लीटर पाणी
Posted on Saturday, August 06, 2011 by maaybhumi desk
नवी दिल्ली
सध्याच्या काळात पिज्जा न आवडणारी व्यक्ती शोधून सापडणे तसे कठीणच, पण तुम्हाला हे माहिती आहे का? की एक किलो पिज्जा बनविण्यासाठी 12000 लीटर पाणी लागत असते. तर तुमच्या आवडत्या ब्रेडच्या एका स्लाइससाठी 40 लीटर पाणी वापरले जाते. थांबा हा आकडा इथेच थांबत नाही, तर सहज मुड आला म्हणून तुम्ही पीत असलेल्या एका लीटर बीयरच्या निर्मितीसाठी 300 लीटर पाण्याची नासाडी केली जाते.
ग्रीन पीस आणि डब्ल्यूएचओ या संस्थांनी केलेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. या संस्थांनी पाण्याच्या भरमसाठी वापराबाबत केलेल्या अभ्यासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. जसे एक चमचा चहा पावडरचे उत्पादन करण्यासाठी 90 लीटर पाणी खर्च होते तर तितक्याच कॉफीसाठी 140 लीटर पाणी खर्च करावे लागते.
या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक व्यक्ती एका वेळी आंघोळ करण्यासाठी 30 लीटर पाणी तर एका वेळी
ब्रश करण्यासाठी एक लीटर पाणी खर्च करीत असते. याशिवाय एक किलो धान्य उत्पादनासाठी 950 लीटर आणि एक किलो गव्हासाठी 500 लीटर पाण्याची आवश्यकता असते. भारतीय पध्दतीचे जेवण बनविताना संपूर्ण प्रक्रियेसाठी 4500 लीटर पाणी लागते.
तर एक लीटर बीयर बनविण्यासाठी 300 लीटर पाण्याची नासाडी केली जाते. नॅशनल जिओग्राफी चॅनलचे डॉ. अर्नेस्ट अल्बर्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार एक भारतीय व्यक्ती एका वर्षात 9 लाख 80 हजार लीटर पाणी खर्च करीत असतो. तर कॉटन डेनिम जींस बनविण्यासाठी 6000 लीटर पाणी वापरले जाते. तर एक किलो मांससाठी 15 हजार लीटर पाणी लागत असते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "एक पिज्जा = 12000 लीटर पाणी"
Post a Comment