लाहोर सात स्फोटांनी हादरले, 57 ठार
Posted on Saturday, March 13, 2010 by maaybhumi desk
पाकिस्तानच्या लाहोर शहरात शुक्रवारच्या दिवसभरात एका पाठोपाठ सात ठिकाणी जोरदार स्फोट झाले असून त्यात आतापर्यंत 57 जण ठार तर शेकडो जखमी झाले आहेत. शहरातील कँट भागात दुपारी दोन स्फोट झाल्यानंतर काही तासांच्या आतच 45 मिनिटांच्या कालावधीत पाच ठिकाणी स्फोट झाले आहेत.
पहिला स्फोट येथील बस स्थानकाजवळ शुक्रवारच्या मुख्य नमाजपूर्वी 12.50 च्या सुमारास झाला. तर दुसरा स्फोट लाहोर शहराच्या आरए बाजार भागात झालेल्या या स्फोटाच्या ठिकाणापासून सैन्य छावणी काही मीटर अंतरावर आहे. जखमी आणि मृतांमध्ये पाकिस्तानी सैन्यातील जवानांचाही समावेश असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दोन्ही स्फोटात 41 जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेला काही तास उलटत नाही तोच शहरातील इकबाल टाऊन भागातील मून मार्केटमध्ये एका मागोमाग स्फोट झाले आहेत.
त्यापैकी पहिला स्फोट काश्मीर ब्लॉक भागातील रिकाम्या जागेत, दुसरा एका घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीत तर तिसरा आणि चौथा एका वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या घराबाहेर झाला आहे. पाचवा स्फोट करीम ब्लॉक भागात झाला असून आतापर्यंत या स्फोटांमध्ये मृतांची संख्या 57 झाली आहे. जखमींमध्ये अनेक जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)

No Response to "लाहोर सात स्फोटांनी हादरले, 57 ठार"
Post a Comment