मुंबईचा राजस्‍थानवर चार धावांनी थरारक विजय

Posted on Saturday, March 13, 2010 by maaybhumi desk


मुंबई
 

युसूफ पठाणच्या झंझावती शतकानंतरही राजस्थान रॉयल्स मुंबईवर विजय मिळवू शकला नाही. शेवटच्या षटकापर्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्‍थानचा चार धावांनी पराभव केला. तर युसूफने आयपीएलमधील पहिले शतक केले.

राजस्थान रॉयल्सच्‍या सुरूवातीच्‍या फलंदाजांकडून अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. सलामीवीर स्वप्नील असनोदकर शून्‍यावर तंबूत परतला. त्यानंतर नमन ओझा (12), ग्रॅम स्मिथ (26) आणि अभिषेक झुनझुनवाला (14) हे देखिल फार टिकाव धरु शकला नाही. यामुळे राजस्थान संघाची अवस्था चार बाद 66 झाली.

त्‍यानंतर आलेल्‍या युसूफ पठाण आणि पारस डोग्रा यांनी सुरवातीला सावध फलंदाजी केली. मात्र नंतर युसूफने आपले खरे स्‍वरूप दाखविले. त्याने चौकार आणि षटकारांची आ‍तषबाजी करीत आपले अर्धशतक केले. युसूफचा झंझावात सुरुच असल्याने सामान मुंबई इंडियन्सच्या हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली. युसूफने 37 चेंडूत शतकी खेळी करीत आयपीएलमधील पहिले शतक केले. शंभर धावा केल्यावर तो दुर्देवीरित्या बाद झाला. त्यानंतर पारस डोग्राने फटकेबाजी करीत विजयाच्या जवळ संघाला नेले. परंतु 41 धावांवर तो बाद झाला.  



तत्पूर्वी, मुंबई इंडियन्‍स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना प्रतिस्‍पर्धी राजस्‍थान रॉयल्‍स संघासमोर विजयासाठी 213 धावांचे अवघड आव्‍हान ठेवले आहे. सलामी फलंदाज जयसूर्याने मेस्करेनहासच्‍या पहिल्‍याच षटकात तीन चौकार ठोकले. मात्र माजी आयसीएल खेळाडू अमित उनियालच्‍या धीम्‍या चेंडूवर तो पायचीत झाला. त्‍यानंतर आलेल्‍या आदित्य तारे आणि सचिन तेंदुलकर यांनी पॉवर प्लेचा चांगला फायदा उचलत चौफेर फटकेबाजी केली. 

आयपीएल सामन्‍यांचा लाईव्‍ह स्‍कोर पाहण्‍यासाठी येथे क्लिक करा
 
पॉवर प्‍ले संपल्‍यानंतर राजस्‍थान संघाच्‍या शेन वॉर्नने मध्यम गती गोलंदाज दमित्रि मस्करेनहासच्‍या हाती चेंडू दिला आणि त्याने कर्णधाराचा विश्‍वास सार्थ ठरवत एकाच षटकात सचिन आणि तारे दोघांनाही बाद केले. दोघांनंतर मैदानावर आलेल्‍या सौरव तिवारी आणि अंबाती रायडू यांनी मात्र त्‍यानंतर जोरदार फलंदाजी करत राजस्‍थानसमोर 20 षटकात 6 बाद 212 धावा केल्‍या आहेत.

यापूर्वी दोन्‍ही संघामध्‍ये आयपीएलमध्‍ये चार सामने झाले असून त्‍यातील दोन सामने 2 राजस्थानने व 1 मुंबईने जिंकला आहे. तर 1 सामना पावसामुळे रद्द करावा लागला आहे.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मुंबईचा राजस्‍थानवर चार धावांनी थरारक विजय"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner