दिल्लीचा पंजाबवर पाच गडी राखून विजय
Posted on Saturday, March 13, 2010 by maaybhumi desk
किंग्स इलेवन पंजाबच्या 142 धावांचा पाठलाग करताना गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील दिल्ली डेअर डेव्हील्स संघाने पाच गडी राखून सामना जिंकला आहे. अखेरच्या चेंडूपर्यंत उत्सुकता शिगेला पोचविणा-या या सामन्यात गंभीरने 72 धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केली.
आयपीएल सामन्यांच्या लाईव्ह स्कोर अपडेटसाठी येथे क्लिक करा
पंजाबच्या 143 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली डेअरडेव्हील्स संघाला श्रीसंथने आपल्या पहिल्याच सामन्यात धडाकेबाज फलंदाज आणि दिलशान तिलकरत्ने यांना सलग बाद करून मोठा झटका दिला.
त्यानंतर काही वेळातच डेविलियर्सही बाद झाल्याने गंभीरवरील दडपण वाढले. मात्र कर्णधाराचे काम चोख बजावताना जबाबदारी पूर्ण खेळी केली. सामन्याच्या अखेरच्या षटकात चार चेंडू शिल्लक असताना तो झेलबाद झाला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकत दिल्ली संघाचा कर्णधार गौतम गंभीरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब किंग्स इलेवन संघाने निर्धारित षटकात 142 धावा केल्या. दिल्लीच्या गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे किंग्स इलेवनच्या संघाला सावरण्याची संधीच मिळाली नाही. संघात रवी बोपाराने 48 चेंडूत 56 धावा केल्या. तर गोलंदाजीत डर्क नेनेसने 12 धावा देत 2 गडी बाद केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "दिल्लीचा पंजाबवर पाच गडी राखून विजय"
Post a Comment