लाहोर स्फोटाप्रकरणी पाकचा भारतावर ठपका
Posted on Sunday, March 14, 2010 by maaybhumi desk
लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केल्यानंतर 'या आरोपांनी आम्ही खोलवर दुखावलो' गेलो आहोत, असे उत्तर भारताने दिले आहे. शिवाय असे बिनबुडाचे नि सिद्ध होऊ न शकणारे आरोप वारंवार करून पाकिस्तान उभय देशातील संबंध आणखी ताणत असल्याचेही म्हटले आहे.
या आरोपांचा निषेध करून या स्फोटांमध्ये आमचा हात अजिबात नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे.
शिवाय पाकिस्तानने असे आरोप करण्यापेक्षा त्या देशातून भारताविरोधात केल्या जाणार्या आणि पाकिस्तान विरोधात उलटणार्या दहशतवादी कारवाया थांबविण्यावर लक्ष केंद्रित करावे असा सल्लाही दिला. लाहोरमध्ये बारा मार्चला झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत ५६ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील मृतांबद्दल भारताने दुःख व्यक्त केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "लाहोर स्फोटाप्रकरणी पाकचा भारतावर ठपका"
Post a Comment