शिवसेनेकडून 7 लाखांची नुकसान भरपाई
Posted on Friday, March 05, 2010 by maaybhumi desk
मुंबई
2009 मध्ये मुंबईतील कॉंटिनेंटल हॉटेलमध्ये मोडतोड केल्या प्रकरणी आता शिवसेनेला सात लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार असून, न्यायालयाने राजकीय पक्षांना वेसण घालण्यासाठी दिलेले आदेश सेनेने मान्य केल्याचे बोलले जात आहे.
राज्यात कुठेही उग्र आंदोलन झाले, अथवा तोडफोड करण्यात आली तर त्याची भरपाई संबंधी पक्षांनीच करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने कायदाही आणला असून, न्यायालयाने त्या आधारे आता अशा पक्षांचे कान उपटायला सुरूवात केली आहे.
अशाच एका प्रकरणात मनसेला 50 हजारांचा भुर्दंड बसला होता. पक्षाने ही रक्कमही दिली आहे. आता सेनाही सात लाख रुपये नुकसान भरपाई म्हणून देणार आहे.
लेबले:
breaking news,
current news,
hot news,
latest news,
maharashtra news,
marathi,
Mumbai,
news,
shiv sena
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 Response to "शिवसेनेकडून 7 लाखांची नुकसान भरपाई"
हे झालंच पाहिजे...आपल्या राजकीय स्वार्थासाठी जनतेला वेठीस धरणा-यांकडून नुकसानीच्या दुप्पट वसुली व्हावी.
Post a Comment