मनाईनंतरही कृपालु महाराजांची भंडारा कृपा 'बरसली'

Posted on Saturday, March 06, 2010 by maaybhumi desk

वृंदावन

उत्तर प्रदेशातील प्रतापगढमध्‍ये कृपालू महाराजांच्‍या भंडा-यात झालेल्‍या चेंगराचेंगरीच्‍या घटनेस दोन-तीन दिवस उलटत नाहीत तोच याच बाबांनी वृंदावनमध्‍ये शनिवारी पुन्‍हा नवा भंडारा आयोजित किया आहे. या भंडा-यात साधुंना आमंत्रित करण्‍यात आले आहे. भंडा-यात आलेल्‍या साधुंना प्रशासनाच्‍या मनाईनंतरही नोट वाटण्‍यात आले.

अर्थात आयोजक अजय त्रिपाठी यांनी या संदर्भात प्रशसनाने मनाई केली असल्‍याचे मान्‍य केले असले तरीही देण्‍यात आलेली दक्षिणा ही परंपरेनुसार दिली गेल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे.

यापूर्वी उत्तर प्रदेशच्‍या कुंडा येथे कृपालुजी महाराजांच्‍या भंडा-यात झालेल्‍या चेंगराचेंगरीत 65 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रशासनाने वृंदावनमध्‍ये या आयोजनासाठी विशेष व्यवस्था केली असून येथे येणा-या लोकांना एक कार्ड देण्‍यात आले आहे. कार्ड दाखविल्‍यानंतरच त्‍यांना आश्रमात प्रवेश दिला जात आहे. आयोजकांनी हा भंडारा गुरू-शिष्‍य परंपरेची आठवण म्हणून आयोजित केल्‍याचा दावा केला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "मनाईनंतरही कृपालु महाराजांची भंडारा कृपा 'बरसली'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner