शहीद खुदीराम बोस यांच्‍या समाधी स्थळी शौचालय

Posted on Saturday, March 06, 2010 by maaybhumi desk

पाटणा

स्‍वातंत्र्य लढ्यात प्राणांची आहुती देणा-या शहीद खुदीराम बोस यांच्‍या समाधी स्‍थळी स्‍थानिक प्रशासनाने शौचालय उभारले असल्‍याचा आरोप बिहार विधानसभेत आमदार किशोर कुमार यांनी उपस्थित केला आहे. राज्‍य सरकारने याबाबत त्‍वरित दखल घेऊन या ठिकाणाची होत असलेली विटंबना थांबवावी अशी मा‍गणी त्यांनी केली आहे.

बिहार विधानसभेत प्रश्‍नोत्तराच्‍या तासा दरम्यान अपक्ष आमदार किशोर कुमार यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शहीद खुदीराम बोस यांना फाशी दिल्‍यानंतर त्‍यांच्‍यावर मुजफ्फरपूरच्‍या बर्निंगघाटवर अंत्यसंस्कार करण्‍यात आला होता. त्‍याच ठिकाणी आता प्रशासनाने शौचालय बनविला आहे.

 तर किंग्सफोर्डमधील ज्‍या ठिकाणी त्यांनी बॉम्ब फेकला होता त्‍या ठिकाणी चिकन सेंटर चालविले जात आहे. हा शहिदांचा अपमान असून तो थांबविण्‍याची मागणी आ. कुमार यांनी केली आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "शहीद खुदीराम बोस यांच्‍या समाधी स्थळी शौचालय"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner