साहित्य संमेलन आयोजकांना पानतावणेंचा विसर!
Posted on Wednesday, March 03, 2010 by maaybhumi desk
दुबई येथे होणा-या दुस-या विश्व मराठी साहित्य संमेलनात गतवर्षीच्या संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर पानतावणे यांना यंदा साधे निमंत्रणही दिले गेले नसल्याची माहिती खुद्द पानतावणे यांनी दिली असून या प्रकाराबद्दल साहित्यप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
दुबईला जाण्यासाठी मुंबई व पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिक व साहित्यप्रेमी रवाना झाले. कोणत्याही संमेलनास माजी अध्यक्षांना आमंत्रित करण्याची प्रथा आहे.
पानतावणे हे गेल्यावर्षीच्या संमेलनाचे अध्यक्ष होते. मात्र यावेळी आयोजक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला त्यांचा विसर पडला असून त्यांना संमेलनात न बोलविल्याने नवीन अध्यक्षांकडे सूत्रे कोण देणार असा प्रश्न उपस्िथत झाला आहे.
विश्व साहित्य संमेलनात पूर्वाध्यक्षांना बोलविण्याची घटनेत तरतूद नाही, असा खुलासा मंडळाच्या काही लोकांनी या कृतीबद्दल केला आहे. मात्र महामंडळाच्या घटनेत विश्व मराठी साहित्य संमेलनाविषयीही काही तरतूद नाही. मात्र तरीही ते भरविण्यात येते. संमेलनात आतपर्यंतच्या सर्व माजी अध्यक्षांना आमंत्रित करणे हा संकेत असतो मात्र तो पाळला गेलेला नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "साहित्य संमेलन आयोजकांना पानतावणेंचा विसर!"
Post a Comment