शिवेंद्र सिंहवरील बंदी संशयास्‍पद

Posted on Wednesday, March 03, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली

पाकिस्तानी खेळाडूला कथितरित्या धडक मारल्याबद्दल भारतीय हॉकी संघाचा धडाकेबाज खेळाडू शिवेंद्रसिंग वर दोन सामन्यांची बंदी घालण्‍यात आली आहे. मात्र शिवेंद्रच्‍या या बंदीमागे काळेबेरे असल्याचा वास येत आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध भारतीय संघाची ताकद जाणूनबुजून कमकुवत करण्याचे षडयंत्र म्हणून ही बंदी घातली गेल्याची भारतीय हॉकीपटूंची भावना बनली आहे.

भारतीय संघाचा कर्णधार राजपाल सिंग याने आपला संघ संपूर्णपणे शिवेंद्रच्या मागे ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवेंद्रने 'चोरी' करूनही त्याला शिक्षा मात्र 'खुनाची' देण्यात आली आहे, अशा शब्दांत त्याने ही शिक्षा गरजेचेपेक्षा जास्त असल्याचे मत व्यक्त केले आहे. ही बंदी उठविण्यात येईल, अशी आशाही त्याने व्यक्त केली आहे.

भारत-पाकदरम्यान झालेल्या सलामीच्या सामन्यात शिवेंद्रने एका पाकिस्तानी खेळाडूला जाणूनबुजून धडक मारल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे या संदर्भात पाकिस्तानी संघाने मात्र काहीही तक्रार केलेली नव्हती. आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे संचालक केन रीड यांनी स्वतः पुढाकार घेऊन शिवेंद्रवर तीन सामन्यांची बंदी घातली.

रीड हे स्वतः ऑस्ट्रेलियाचे असून भारताचा आजचा सामनाही ऑस्ट्रेलियाविरूद्ध आहे, हा संबंध लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक जोस ब्रासा यांनी या निर्णयाबद्दल रीड यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. खेळता खेळता चुकून घडलेल्या घटनेची एवढी मोठी शिक्षा शिवेंद्रला देण्यात आली आहे. इतर सामन्यात याहीपेक्षा गंभीर गुन्हे घडूनही शिक्षा होत नाही, मात्र या बाबतीत मात्र उगाचच कठोर भूमिका घेण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "शिवेंद्र सिंहवरील बंदी संशयास्‍पद"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner