बरेली दंगल: मौलाना तौकीर यांना अटक
Posted on Tuesday, March 09, 2010 by maaybhumi desk
बरेली
उत्तर प्रदेशातील बरेली शहरात हिंसाचार पसरवण्यास जबाबदार असलेल्या इत्तेहाद मिल्लत कौन्सिल व मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे अध्यक्ष मौलाना तौकीर रजा खां यांना काल रात्री अटक करण्यात आली असून, अजूनही शहरातील काही भागात तणाव कायम असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
एका धार्मिक संमेलनानंतर शहरातील बारादरी, किल्ला, प्रेमनगर व इतर काही भागात दंगल उसळल्याने या भागात संचारबंदी लावण्यात आली होती.
शांतता भंग करणे, धार्मिक भावना दुखावणे आरोपांखाली रजा खां यांना अटक करण्यात आली असून, मागील सलग आठ दिवसांपासून शहरात तणाव असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "बरेली दंगल: मौलाना तौकीर यांना अटक"
Post a Comment