आयपीएलचा 'महाथरार' सुरू

Posted on Friday, March 12, 2010 by maaybhumi desk

पहिला सामना डेक्कन चार्जर्स वि. कोलकाता नाईट रायडर्स


मुंबई


गेल्‍या अनेक दिवसांपासून क्रिकेट शौकीनांना प्रतीक्षा लागून असलेल्‍या इंडियन प्रीमियर लीग-3 (आयपीएल) च्‍या महाथरारास आजपासून सुरूवात होत असून पहिला सामना गतविजेत्‍या डेक्कन चार्जर्स विरोधात कोलकाता नाइट रायडर्समध्‍ये होत आहे. दक्षिण आफ्रीकेच्‍या मैदानावर झालेल्‍या दुस-या आयपीएलमध्‍ये नाइटराइडर्सचा संघ अखेरच्‍या आठव्‍या क्रमांकावर होता. आता हे सामने पुन्‍हा घरगुती मैदानावर होणार असल्‍याने त्याबाबत उत्सुकता आहे.


आयपीएलचा स्‍कोर अपडेट पाहण्‍यासाठी इथे क्लिक करा


नाइट रायडर्सचे नेतृत्व पुन्‍हा एकदा भारतीय संघाचा एकेकाळचा यशस्‍वी कर्णधार सौरव गांगुलीकडे आहे. यावेळी संघात न्यूझीलँडचा ब्रँडन मॅक्कुलम आणि वेस्टइंडीजचा ख्रिस गेल सारखे धमाकेदार फलंदाज नसल्‍याने ऑस्ट्रेलियाच्‍या ब्रॅड हॉज सलामीला उतरणार हे जवळपास निश्चित आहे. तर कर्णधार गांगुली तिस-या क्रमांकावर असणार आहे. त्‍यानंतर विग्नेश, ओवेश शाह आणि मनोज तिवारी मधल्‍या फळीत उतरणार आहेत. अष्‍टपैलू लक्ष्मीरतन शुक्ला आणि श्रीलंकेचा एंजेलो मॅथ्यूज यांच्‍या फलंदाजीचीही जादू पहायला मिळणार आहे.


तर गत विजेत्‍या डेक्कन चार्जर्सची फलंदाजी ही मोठी ताकद आहे. संघात कर्णधार एडम गिलक्रिस्ट, एंड्रयु सायमंड्स, हर्शल गिब्स आणि रोहित शर्मा यांच्‍यासारखे धुरंधर फलंदाज आहेत. तर वेणुगोपाल राव, रवि तेजा आणि टी. सुमन देखिल मोठी धावसंख्‍या उभारण्‍यात सक्षम आहेत. गोलंदाजांच्‍या बाबतीत मात्र संघ कमकुवत आहे. अर्थात संघात आर.पी. सिंह सारखा भेदक गोलंदाज असला तरीही तो कितपत यशस्‍वी ठरतो हे आव्‍हानच आहे. वेस्टइंडीजचा गोलंदाज केमार रोश या सामन्‍यात नसल्‍याने फिरकीपटू प्रज्ञान ओझावर मोठी जबाबदारी असणार आहे.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "आयपीएलचा 'महाथरार' सुरू"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner