आता एसटीची ई-तिकीट सेवा

Posted on Friday, May 21, 2010 by maaybhumi desk


मुंबई

महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन महामंडळातर्फे आता एसटी प्रवाशांसाठी ई-तिकीटची सुविधा उपलब्‍ध करून देण्‍यात आली असून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्‍या हस्‍ते दादर ते पुणे वातानुकूलित शिवनेरी गाडीचे ई-तिकीट आरक्षण करून या सेवेचे सह्याद्री अतिथिगृहात उदघाटन करण्‍यात आले.

एसटीने सुरू केलेल्या या नव्या सेवेमुळे विमान व रेल्‍वेच्‍या तिकिटाप्रमाणे आता एसटीच्या प्रवाशांनाही घरबसल्या किंवा एजंटच्या कार्यालयात जाऊन ई-तिकीट आरक्षित करता येणार आहे.


त्‍यासाठी परिवहन मंडळाच्‍या http://www.msrtc.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन आधी नोंदणी करावी लागणार आहे. त्‍यानंतर ई-तिकिट काढता येणार आहे.

दरम्यान, एसटीमध्ये वाहकांकडून दिली जाणारी कागदी तिकिटे लवकरच बंद करण्‍यात येणार असून त्‍या ऐवजी इलेक्‍ट्रॉनिक तिकीट इश्‍यू मशीनमधून तिकिटे दिली जाणार आहेत. प्रायोगिक तत्‍वावर त्‍यांची तपासणी सुरू झाली असून राज्‍यभर त्‍याच्‍या वापरासाठीच्‍या महामंडळाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत परवानगी देण्यात आली

असल्‍याचे मुख्‍यमंत्री चव्‍हाण यांनी सांगितले. यावेळी उपमुख्‍यमंत्री छगन भूजबळ, परिवहन मंत्री राधाकृष्‍ण विखे- पाटील व परिवहन महामंडळाचे अध्‍यक्ष सुधाकरपंत परिचारक आदी उपस्थित होते.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




1 Response to "आता एसटीची ई-तिकीट सेवा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner