पोलंड राष्ट्राध्यक्षांचा विमान अपघात नव्हे घात!
Posted on Friday, May 21, 2010 by maaybhumi desk
पोलंडचे राष्ट्राध्यक्ष लेख कॅंझिस्की आणि देशातील अनेक दिग्गज मंत्री व सैन्य अधिका-यांच्या विमान अपघातामागे घातपाताची शक्यता तपासातून समोर आली असून अपघाताच्या वेळी विमानाच्या कॉकपिटमध्ये वैमानिकांसह आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती उघड झाली आहे. वैमानिकाला वारंवार मनाई करूनही त्याने विमान उतरवल्यानंतर हा अपघात घडला होता.
गेल्या दहा एप्रिल रोजी झालेल्या या अपघातात पोलंडचे राष्ट्राध्यक्ष, तिन्ही सेनादलाचे प्रमुख, सरकारमधील अनेक मंत्री व खासदारांसह सुमारे 132 जण या अपघातात मारले गेले आहेत. या संदर्भात तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे अध्यक्ष एलेक्सेई मोरोजॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातापूर्वीपर्यंत टोपोलोव्ह-154 हे विमान पूर्णपणे व्यवस्थित होते.
या विमानाच्या कॉकपिटमध्ये आवाजावरून आणखी एक अनधिकृत व्यक्ती असल्याचे तपासातून समोर आले आहे. ही व्यक्ती कोण होती याचा शोध सुरू असून हा दहशतवादी कट असल्याची शक्यता मात्र नाकारण्यात आली आहे.