बाल्ड अँड ब्युटीफूल- बार्बरा मोरी
Posted on Friday, May 21, 2010 by maaybhumi desk
9
पण राकेशने तिचा हा अवतार पाहून तिला चित्रपटात घ्यावे की न घ्यावे यावर विचार करायला सुरवात केली. कारण सहा महिन्यांनंतर शुटींग सुरू होणार होते. बार्बराला कथा आवडली. त्यामुळे सहा महिन्यात केस वाढवीन असे तिने सांगितले. चित्रपट कोणत्याही परिस्थितीत हातातून जाऊ नये अशी तिची इच्छा होती.
तिकडे दिग्दर्शक अनुराग बसूला तर बिनाकेसांची बार्बराही चित्रपटाला चालणार होती. पण लहान केसांच्या मुली बॉलीवूडमध्ये चालत नाहीत, असे राकेशने त्याला सांगितले. पण शुटींग सुरू होईपर्यंत बार्बराचे केस वाढले आणि ती अधिकच सुंदर दिसायला लागली.