'काईट्स' जन्‍माची कथा

Posted on Thursday, May 20, 2010 by maaybhumi desk

या वर्षांत रिलीज होणार्‍या बड्या फिल्म्समध्ये काईट्सचा समावेश होतो. हिंदी चित्रपटसृष्टी या चित्रपटाकडे डोळे लावून बसली आहे. या चित्रपटाचे काईटस नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. या नावाचे निर्माते आहेत चित्रपटाचे निर्माते राकेश रोशन.


राकेश एकदा आकाशात दोन पतंग उडताना पहात होते. त्यांना ते चित्र फार रोमॅंटिक वाटलं. दोन्ही पतंग उडताना कधी कधी जवळ येत, तर कधी दूर जात. जणू काही त्यांचा खेळ सुरू आहे असं वाटत होतं. त्यांच्या पतंगाची दोरी मात्र कुणा दुसर्‍याच्याच हातात होती.
तो कधीही ही दोरी कापू शकतो. त्यावेळी हे दोन्ही पतंग परस्परांपासून वेगळे होतील. हे विचार मनात येताच राकेश यांनी लगेचच कथा लिहून टाकली. चित्रपटाचे नाव काईटस हेही त्याचवेळी ठरले.


दिग्दर्शक अनुराग बसूच्या मते काईटस ही एक प्रेमकथा आहे. भाषा, समाज आणि सीमांच्या पलीकडे ही कथा आहे. यात कधी काय होईल कुणालाही सांगता येणार नाही.
हा चित्रपट २१ मे रोजी साठ देशात रिलीज होणार आहे. हिंदी व इंग्रजी अशा दोन भाषांत तो रिलीज होईल.
चित्रपटात ह्रतिक रोशन आणि मेक्सिकन स्टार बार्बरा मोरी प्रमुख भूमिकेत आहेत. त्यांच्यासोबत कंगना राणावत, कबीर बेदी आणि निक ब्राऊन आहेत.


वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'काईट्स' जन्‍माची कथा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner