'अर्थ अवर'- एक तास पृथ्‍वीसाठी!

Posted on Saturday, March 27, 2010 by maaybhumi desk


आज जगभरात 'अर्थ अवर' पाळला जाणार आहे. त्या अंतर्गत रात्री साडेआठ ते साडेनऊ या काळात वीज बंद ठेवली जाईल. जगातील १२१ देश यात भाग घेत आहेत. गेल्या वर्षी ८८ देशांनी यात भाग घेतला होता. वेबदुनिया परिवारही आपणास आज रात्री एक तास वीज बंद ठेवण्याचे आवाहन करीत आहे.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असलेला उर्जेचा व्यय कमी करण्यासाठी आणि त्याकडे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ही संकल्पना वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचरतर्फे सुरू करण्यात आली. जगातील पाच कोटी लोक अर्थ अवरशी निगडीत आहेत. शंभराहून अधिक देशात त्याचे जाळे पसरले आहे.

लाल किल्ला व बुर्ज खलिफाही अंधारात अर्थ अवरच्या काळात दिल्लीतील लाल किल्ला, दुबईचा बुर्ज खलिफा, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी व इजिप्तमधील पिरॅमिड येथील वीजही बंद केली जाईल. त्यामुळे तासभर या वास्तू अंधारात असतील.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'अर्थ अवर'- एक तास पृथ्‍वीसाठी!"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner