'हायकमांड'चे आदेश शिरसावंद्य; मुख्‍यमंत्र्याचा मधला मार्ग

Posted on Saturday, March 27, 2010 by maaybhumi desk


एक दिवस आधीच साहित्य संमेलनाला हजेरी

पुणे (कविवर्य विंदा करंदीकर साहित्य नगरी) (Pune)

यापुढे अमिताभ बच्‍चन यांच्‍या सोबत कुठल्‍याही व्‍यासपीठावर एकत्र जाऊ नका असे '10 जनपथ'वरून आलेले आदेश प्रमाणवाक्य मानत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज पुणे येथे सुरू असलेल्‍या मराठी साहित्य संमेलनात नियोजित कार्यक्रमाच्‍या एक दिवस आधीच हजेरी लावून संभाव्‍य वाद टाळला. अमिताभ या संमेलनात रविवारी होणा-या समारोपासाठी उपस्थित राहणार आहेत.


यापूर्वीच्‍या निश्चित कार्यक्रमानुसार पुणे येथे सुरू असलेल्‍या 83 व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य (Marathi Sahitya Sammelan) संमेलनाच्‍या समारोपासाठी मुख्‍यमंत्री चव्‍हाण व महनायक अमिताभ बच्‍चन एकत्र येणार होते. हे निमंत्रण दोघांनी स्‍वीकारलेही होते.

मात्र सी-लिंक साठीच्‍या चार नवीन लेनच्‍या उदघाटन समारंभात अमिताभ यांच्‍या उपस्थितीने निर्माण झालेल्‍या वादाच्‍या पार्श्‍वभूमीवर चव्हाण यांनी आधीच कार्यक्रमास हजेरी लावली आहे.



Ashok Chavan not to share dais with Amitabh

Pune: 

After the controversy over their joint appearance at the inauguration of Bandra-Worli sealink in Mumbai, Maharashtra Chief Minister Ashok Chavan has decided not to share the dais with superstar Amitabh Bachchan at a Marathi literary meet here.

Chavan, who was invited to attend the concluding ceremony of Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan along with Bachchan tomorrow, has changed his plans and will visit the venue today itself, Chairman of the Sammelan's reception committee Satish Desai said.

The Chief Minister would be taken around the venue and visit the book exhibition, he added. Bachchan will attend the Sammelan tomorrow as scheduled, Desai said.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'हायकमांड'चे आदेश शिरसावंद्य; मुख्‍यमंत्र्याचा मधला मार्ग"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner