'कवि'ला ऑस्करची हुलकावणी

Posted on Monday, March 08, 2010 by maaybhumi desk

झोपडपट्टीत रहाणार्‍या एका गरीब भारतीय मुलाच्या धडपडीवर आधारीत 'कवि' नावाच्या एका लघुपटाला ऑस्कर काही मिळू शकला नाही. डेनमार्कच्या 'द न्यू टेनंटस' या चित्रपटाने या विभागात ऑस्कर पटकावले. कविचे दिग्दर्शन ग्रेग हेल्वे यांनी केले होते. १९ मिनिटाचा हा लघुपट भारताशी संबंधित असल्याने त्याविषयी कुतूहल होते.

हा चित्रपट भारताची गरीबी दर्शवितो, अशी टीकाही त्यावर करण्यात आली होती. गेल्या वर्षी स्लमडग मिलिनियर आणि स्माईल पिंकी या ऑस्कर प्राप्त चित्रपटांतही गरीबी हे सुत्र होते.
त्या आधारे यंदा कविलाही हा पुरस्कार मिळेल असा होरा होता. मात्र, तो चुकीचा ठरला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "'कवि'ला ऑस्करची हुलकावणी"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner