ऑस्कर २०१०- कॅथरीने घडविला इतिहास!
Posted on Monday, March 08, 2010 by maaybhumi desk
आतापर्यंत ऑस्करच्या इतिहासात चार महिलांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी नामांकन लाभले होते. त्यातल्या एकीलाही प्रत्यक्षात हा पुरस्कार मिळालेला नव्हता.
कॅथरीन ही पहिलीच ऑस्करप्राप्त महिला दिग्दर्शक ठरली आहे. विशेष म्हणजे कॅथरीनची स्पर्धा अवतार या बहुचर्चित न गाजलेल्या चित्रपटाचा दिग्दर्शक जेम्स कॅमरूनशी होती आणि हा कॅमरून तिचा माजी पती आहे.
कॅथरीने द हर्ट लॉकरच्या निमित्ताने सहा वर्षांनी या क्षेत्रात पुनरागमन केले. २००२ मध्ये तिने हॅरीसन फोर्डला घेऊन 'के-१९ द विडोमेकर' हा चित्रपट केला होता. पण तो पडला होता.
२७ नोव्हेंबर १९५१ ला जन्मलेली कॅथरीन एका फॅक्टरी मॅनेजर व लायब्ररीयनची मुलगी आहे. करीयरची सुरवात तिने चित्रकार म्हणून केली होती. त्यानंतर ती चित्रपटांकडे वळली. १९७८ मध्ये तिने 'द सेट अप' नावाचा लघुपट केला होता. त्यानंतर द लव्हलेस हा पूर्ण लांबीचा चित्रपट केला. नीयर डार्क या हॉररपटाने तिने अनेकांना घाबरवून सोडले. पॉईंट ब्रेक या चित्रपटासाठी तिचे अनेकांनी कौतुक केले.
ताज्या 'हर्ट लॉकर'मध्ये इराकी युद्धभूमीवर दिवस नि रात्र लढणार्या सैनिकांचे अंतर्गत संबंध, त्यांचे भावबंध यांचे चित्रण केले आहे. त्यासाठी तिला २५ हून अधिक पुरस्कारही मिळाले आहेत.
लेबले:
bollywood,
current news,
film,
film gossips,
film preview,
film review,
films,
gossips,
hollywood,
hot news
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "ऑस्कर २०१०- कॅथरीने घडविला इतिहास!"
Post a Comment