विधेयकावर सर्वपक्षीय बैठकीनंतर निर्णय
Posted on Monday, March 08, 2010 by maaybhumi desk
नवी दिल्ली
संसदेच्या दोन्ही सभागृहात दिवसभर चाललेल्या गोंधळातच सभापटलाव ठेवण्यात आलेल्या महिला आरक्षण विधेयकावर आज सायंकाळी होणारे मतदान उद्यावर ढकलण्यात आले असून भाजपने विधेयकावर चर्चेची मागणी केल्यामुळे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी उद्या सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले आहे. त्यानंतरच विधेयका संदर्भात निर्णय होणार आहे.
तत्पूर्वी, आरक्षण विधेयकाला विरोध करीत असलेल्या समाजवादी पक्षाच्या खासदारांनी दिवसभर गोंधळ घातल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरात चार वेळा स्थागित करावे लागले. अखेर सायंकाळी सहा वाजता ते दिवसभरासाठी तहकुब करण्यात आले आहे. तर लोकसभेचे कामकाजही स्थगित करण्यात आले आहे.
राज्यसभेत विधेयकाच्या प्रती फाडल्यानंतर आणि सभापतींसोबत उध्दटपणे वागणूक केल्यामुळे सभागृहात मार्शल बोलवण्याची गरज पडली असून सभागृहात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सभागृहाच्या टेबलवरून पेन व पुस्तके काढून घेण्यात आली होती.
लेबले:
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
top news
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "विधेयकावर सर्वपक्षीय बैठकीनंतर निर्णय"
Post a Comment