एसआयटी चौकशीसाठी मोदींच्या घरी जाणार
Posted on Wednesday, March 24, 2010 by maaybhumi desk
गुजरात (gujarat) दंगल प्रकरणाची चौकशी करीत असलेली एसआयटी टीम आता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घरी जाऊन त्यांची चौकशी करणार आहे. सुरक्षा कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एसआयटीने स्पष्ट केले असले तरीही या चौकशीची कुठलीही तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली तरीही ती 27 असण्याची शक्यता आहे.
अहमदाबादच्या गुलबर्ग सोसायटीत झालेल्या हत्याकांड प्रकरणा संदर्भात मोदींची चौकशी केली जाणार असून एसआयटीने या संदर्भात चौकशीसाठी त्यांना समन्स बजावले होते. गुलबर्ग (gulmarg) सोसायटीत कॉंग्रेसचे माजी खासदार अहसान जाफरी यांच्यासह 69 जणांची हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मोदींना हे समन्स बजावण्यात आले आहेत.
लेबले:
BJP,
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
top news

Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "एसआयटी चौकशीसाठी मोदींच्या घरी जाणार"
Post a Comment