कोलकाताः आगीतील मृतांचा आकडा 25 वर

Posted on Wednesday, March 24, 2010 by maaybhumi desk

कोलकाता (Kolkata)

शहरातील गजबजलेल्या पार्क स्ट्रीट भागातील 150 जुन्या इमारतीला लागलेल्या आगीतील मृतांचा आकडा आता 25 वर गेला आहे. यात अनेक जण गंभीर भाजले असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अग्निशमन दलाच्या (fire briged) अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर इमारतीवरून सहा जणांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या परंतु यात त्यांचा बळी गेला. या भागात बचाव कार्य चालू असून, अजूनही यात अनेक जण अडकल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

पोलिस आयुक्त गौतम मोहन चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार आगीवर नियंत्रण करण्यात आले असून, इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर जळलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळत आहेत.

आग नियंत्रित करण्यासाठी अग्निशमन दलाच्या 41 गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. अनेकांनी भीतीने पहिल्या व दुस-या मजल्यावरून उड्या मारल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "कोलकाताः आगीतील मृतांचा आकडा 25 वर"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner