साहित्य संमेलनात अमिताभ व सचिन येणार

Posted on Wednesday, March 03, 2010 by maaybhumi desk

पुणे
पुण्यात होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला ग्लॅमर मिळवून देण्‍यासाठी दिग्गजांना बोलावण्‍यासाठी संयोजकांचे जोरदार प्रयत्न सुरू असून  बिग बी अमिताभ बच्चन व मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. दोघेही दिग्गज कविपुत्र असल्‍याने त्यांना संमेलनाचे निमंत्रण पाठवले जाण्‍याचे संकेत आयोजकांनी दिले आहेत.




अमिताभ बच्‍चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन हे हिंदीतील प्रतिष्‍ठीत कवी असून त्यांच्या 'मधुशाला'चे मराठी रसिकही दिवाणे आहेत. तर सचिनचे वडीलही कवी होते. त्‍यामुळे पुण्‍यातील संमेलनात दोन्ही दिग्गजांची जुगलबंदी पहायला मिळावी अशी आयोजकांची इच्‍छा आहे. त्‍यासाठी संयोजन समितीमधील काही सदस्य बच्चन यांना निमंत्रण देण्यासाठी मुंबईला रवाना झाले असून त्‍यांना होकार मिळण्‍याची शक्यता आहे.
सचिन तेंडुलकर मात्र गेल्‍या काही दिवसांपासून सतत क्रिकेटमध्‍ये व्यस्त असल्‍याने अद्याप आयोजकांना भेटू शकलेला नाही. त्‍यालाही लवकरच भेटून निमंत्रण दिले जाण्‍याचे संकेत मिळाले आहेत.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "साहित्य संमेलनात अमिताभ व सचिन येणार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner