हॉकी वर्ल्‍डकपची स्‍वप्‍ने धुळीस

Posted on Friday, March 05, 2010 by maaybhumi desk

सेमीफायनलमध्ये प्रवेशाची आस लावलेल्या कोट्यवधी भारतीय हॉकी प्रेमींच्या पदरी भारतीय हॉकी संघाने निराशा टाकली आहे. हॉकी संघातील खेळाडूंच्या चेहऱ्यांवरचा रंग पार लयाला गेला असून, स्पेनकडून भारतीय संघाला 5-2 असा लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागल्याने भारत विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

पाकिस्तान सोबत भारतीय संघाने केलेला दमदार खेळ अजूनही भारतीय प्रेक्षकांच्या मनात ठासून भरला आहे. याच खेळाच्या जोरावर त्यांनी स्पेनसोबतचा सामनाही असाच जिंकू अशी आशा केली होती.
परंतु आक्रमकतेचा अभाव, खेळात नसलेले सातत्य, बचाव फळीचा कमकुवतपणा या सारख्या कारणांमुळे भारतीय संघाला पहिल्याच हाफमध्ये मोठा फटका बसला.

ऑस्ट्रेलिया सारख्या दिग्गज संघाकडून भारताचा पराभव झाल्यावरही भारतीय क्रीडा प्रेमी निराश झाले नव्हते. स्पेनचा सामना मात्र संघासाठी महत्त्वाचा होता.

यापूर्वीच्या सामन्यात स्पेनचा 1-2 असा पाकने पराभव केला होता. मध्यांतरापर्यंत स्पेनने 2-0 अशी बढत घेतल्याने भारतावरील दडपण वाढतच गेले होते. अखेरीस व्हायचे तेच झाले व सामना भारताच्या हातून निसटला.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "हॉकी वर्ल्‍डकपची स्‍वप्‍ने धुळीस"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner