उत्तर प्रदेशात चेंगराचेंगरीत ६५ मृत्युमुखी
Posted on Thursday, March 04, 2010 by maaybhumi desk
उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील कृपालू महाराजांच्या आश्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीस जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
प्रतापगड जिल्ह्यातील मानगड भागात असलेल्या कुंडा या गावात ही घटना घडली. दिल्लीपासून हे ठिकाण १८० किलोमीटरवर आहे. कृपालू महाराजांच्या आश्रमात आज भंडारा होता. त्यासाठी हजारो लोक येते आले होते. आश्रमाचा मोठा विस्तार आहे.
परंतु, भंडारा अतिशय चिंचोळ्या जागेत होता. तेथे जाण्यासाठी केवळ एकच दरवाजा होता. गर्दी झाल्याने हा दरवाजाही बंद करण्यात आला. पण गर्दीच्या दबावापुढे हा दरवाजा तुटला आणि चेंगराचेंगरी झाली. यावेळी कृपालू महाराजही उपस्थित होते.
आतापर्यंत साठ मृतदेह हाती लागले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) ब्रिज पाल यांनी व्यक्त केली. जखमींपैकी काही जण अत्यवस्थ आहेत.
लेबले:
breaking news,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
news,
top news
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "उत्तर प्रदेशात चेंगराचेंगरीत ६५ मृत्युमुखी"
Post a Comment