आयपीएलचे टेंडर रद्द

Posted on Sunday, March 07, 2010 by maaybhumi desk

मुंबई

इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) दोन नवीन संघ विक्रीसाठी काढलेले टेंडर रद्द केले आहेत. हे टेंडर नवीन फ्रेंचायजी ख्‍ारेदीसाठी काढण्‍यात आले होते. त्‍यात एक अब्‍ज डॉलरची नेटवर्थची अट घालण्‍यात आली होती. त्‍यावर बरीच टीका झाल्‍यानंतर ही अट आता रद्द करण्‍यात आली आहे. आता ही अट रद्द करण्‍यात आली असून नवीन टेंडर 9 मार्च रोजी काढले जाणार आहे. तर दोन्‍ही संघांची घोषणा विधिवत 21 मार्च रोजी केली जाणार आहे.
ट्वेंटी-20 लीगच्‍या गव्‍हर्निंग काउंसिलच्‍या बैठकीनंतर आयपीएल कमिश्नर ललित मोदी यांनी दिलेल्‍या माहितीनुसार टेंडरची रद्द करण्‍यात आली असून आतापर्यंत सादर झालेले टेंडर न उघडता तसेच परत पाठविण्‍यात आले आहेत.

नवीन टेंडर 9 मार्चला जाहीर करण्‍यात येणार असून ते टेंडर 21 मार्च उघडण्‍यात येतील.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "आयपीएलचे टेंडर रद्द"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner