महिला आरक्षण विधेयकः काऊंडडाऊन सुरू

Posted on Sunday, March 07, 2010 by maaybhumi desk

नवी दिल्ली


संसदेत सादर होणा-या महिला आरक्षण विधेयकाची उलट मोजणी सुरू झाली असून सर्वच राजकीय पक्षांमध्‍ये या विधेयकावरून उघड मतभेद समोर येऊ लागले आहेत. त्‍यामुळे पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्‍हान उभे राहीले आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्‍या भाजपने या विधेयका संदर्भातील पक्षांतर्गत मतभेद मिटविण्‍यासाठी आज कोर गृपची बैठक घेतली असून या विधेयकाच्‍या बाजूने मतदानाचे आदेश जारी केले आहेत.



तर दुस-या बाजूला विधेयकाचा विरोध करत असलेल्‍या जदयुमध्‍येही वाद निर्माण झाले आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी विधेयकाच्‍या बाजूने मत व्‍यक्त केले आहे. तर पक्षाचे दुसरे वरिष्‍ठ शरद यादव यांनी त्‍यास विरोध केला आहे.


click hereसत्ताधारी पक्षाने महिला आरक्षण विधेयक सोमवारी राज्यसभेत सादर करून महिला दिनाची भेट देण्‍याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह‍ आणि संपुआ अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी विधेयकास सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे.


भाजप कोरगृपची बैठक

भाजपमध्‍ये या विधेयका संदर्भात उघडपणे मतभेद निर्माण झाले असून पक्षातील राखीव मतदार संघातून निवडून येणा-या खासदारांनी विधेयकाच्‍या सद्य स्‍वरूपाचा विरोध केला आहे. या खासदारांनी आरक्षण कोटामध्‍येच कोट्याची मागणी केली आहे. त्‍यामुळे अंतर्गत विद्रोह दडपण्‍यासाठी पक्षाच्‍या कोरगृपची आज एक बैठक होऊन त्यात विधेयकाच्‍या बाजूने मतदान करण्‍याचे आदेश जारी करण्‍यात आले आहेत.


भाजपमध्‍ये विधेयकास विरोध करणा-यांमध्‍ये विनय कटियार यांचाही समावेश आहे. कटीयार हे राज्यसभा खासदार आहेत. पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी विधेयकात दुरुस्‍त्याकरून ते मंजूर करण्‍यास पक्ष कटीबध्‍द असल्‍याचे जाहीर केले आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "महिला आरक्षण विधेयकः काऊंडडाऊन सुरू"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner