विंदांच्‍या नावाने जीवनगौरव पुरस्‍कार

Posted on Saturday, March 27, 2010 by maaybhumi desk

पुणे (कविवर्य विंदा करंदीकर साहित्य नगरी)

दिवंगत कविवर्य विंदा करंदीकर यांच्‍या साहित्य सेवेची आठवण म्हणून त्‍यांच्‍या नावाने शासनाकडून विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्‍कार सुरू करण्‍याची घोषणा मुख्‍यमंत्री अशोक चव्‍हाण यांनी संमेलनात केली आहे.

पुणे येथे सुरू असलेल्‍या 83 व्‍या मराठी साहित्य संमेलनास भेट दिल्‍यानंतर उपस्थित साहित्यिकांशी संवाद साधताना मुख्‍यमंत्र्यांनी ही घोषणा केली.
साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणा-या व्‍यक्तीस 1 लाख रुपये, मानपत्र आणि स्‍मृतिचिन्‍हाच्‍या स्‍वरूपात दरवर्षी साहित्य संमेलनातच हा पुरस्‍कार दिला जावा अशी सूचना मुख्‍यमंत्र्यांनी मांडली असून त्या संदर्भात लवकरच अध्‍यादेश जारी केला जाणार असल्‍याचे सांगितले. पुरस्‍कारासाठीच्‍या व्यक्तीची निवड करण्‍याचे अधिकार साहित्य महामंडळाकडे असतील.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "विंदांच्‍या नावाने जीवनगौरव पुरस्‍कार"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner