साहित्य संमेलनस्थळी वैद्यकीय सुविधा

Posted on Friday, March 26, 2010 by maaybhumi desk

पुणे (pune)

साहित्य संमेलनातील साहित्यप्रेमींसाठी संमेलनस्थळी [स.प. महाविद्यालय] तातडीने औषधोपचार देण्यासाठी वैद्यकीय पथक कार्यरत राहणार आहे. आवश्यकता भासल्यास रुग्णांना संमेलनस्थळाजवळ असलेल्या पाच रुग्णालयात दाखल करण्याच्या द्रुष्टीने तयारी ठेवण्यात आली आहे. अशी माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. देसाई यांनी दिली आहे.


तसेच, साहित्यप्रेंमीमध्ये चाळीशी पार केलेल्यांची संख्या लक्षात घेऊन तीन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात संमेलनस्थळी वैद्यकीय पथक कार्यरत असेल.दोन डॉक्टर आणि परिचारिका रुग्णांवर उपचार करतील.आवश्यकता भासल्यास रुग्णाला दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आहे. पूना, दिनानाथ मंगेशकर, सह्याद्री, भावे आणि कॉलनी नर्सिंग होम या पाच रुग्णालयांशी बोलणी झाली आहे.



वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "साहित्य संमेलनस्थळी वैद्यकीय सुविधा"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner