संमेलननगरीस कविवर्य विंदा करंदीकर यांचे नाव
Posted on Friday, March 26, 2010 by maaybhumi desk
८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच्या संमेलननगरीस ज्येष्ठ कविवर्य विंदा करंदीकर यांचे नाव देण्यात आलेले आहे. संमेलननगरीस तीन प्रवेशद्वार आहेत. पहिले प्रवेशद्वार स.प. महविद्यालयाचे प्रवेशद्वार असून त्यास 'कुसुमाग्रज प्रवेशद्वार' असे नाव देण्यात आले आहे. दुसरे प्रवेशद्वार लोकमान्यनगरचे असून त्यास 'वि.स.खांडेकर' असे नाव देण्यात आलेले आहे.
साहित्य संमेलनाचे थेट प्रक्षेपण पहा
तिसरे प्रवेशद्वार विजयानगर कॉलनीचे असून त्यास 'श्री.म.माटे प्रवेशद्वार' असे नाव देण्यात आलेले आहे. संमेलननगरीत दोन मोठी सभागृह आहेत. त्यापैकी एका सभागृहास लोकनेते 'यशवंतराव चव्हाण' यांचे नाव देण्यात आलेले आहे , तर दुसर्या सभागृहास 'आचार्य अत्रे' यांचे नाव देण्यात आले आहे. ग्रंथप्रदर्शनास 'सावित्रिबाई फुले ग्रंथनगरी' असे नाव देण्यात आले आहे. संमेलनाच्या तीनही दिवस कवी कट्टा चालु राहणार आहे. त्यास 'अण्णाभाऊ साठे कवी कट्टा' असे नाव देण्यात आलेले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "संमेलननगरीस कविवर्य विंदा करंदीकर यांचे नाव"
Post a Comment