बिग बी आणि चव्हाण पुन्हा एका व्यासपीठावर येणार!
Posted on Friday, March 26, 2010 by maaybhumi desk
मुंबई
वांद्रे-वरळी सी-लिंकच्या उदघाटन समारंभासाठी महानायक अमिताभ बच्चन यांना बोलावल्याबद्दल स्वपक्षीयांच्या टीकेचे लक्ष्य ठरलेल्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरील वादाचा धुराळा अद्याप शमला नसतानाच पुन्हा एकदा दोघेही एका व्यासपीठार येणार असून याबाबतही पुन्हा चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
पुणे येथे सुरू असलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपास मुख्यमंत्री चव्हाण आणि अमिताभ बच्चन दोघांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे यावेळी दोघे पुन्हा एका व्यासपीठावर येणार आहेत.
संमेलनाच्या समारोपासाठी अमिताभ यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनाही त्यासाठीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
अर्थात सी लिंक उदघाटन कार्यक्रमात अमिताभ यांच्या उपस्थितीबद्दल आपल्याला माहिती नव्हती अन्यथा आपण कार्यक्रमास गेलो नसतो अशी बचावात्मक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मात्र संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर अमिताभ आणि मुख्यमंत्री चव्हाण दोघांचे नाव प्रकाशित करण्यात आले आहेत. आता चव्हाण या कार्यक्रमास जातात किंवा नाही याबाबत चर्चा रंगत आहेत.
दरम्यान, संमेलनाच्या आयोजकांनी साहित्य आणि संस्कृतीच्या मंचावर अमिताभ आणि चव्हाण यांच्या एकत्र येण्यास काहीही अडचण येणार नसल्याचे म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "बिग बी आणि चव्हाण पुन्हा एका व्यासपीठावर येणार!"
Post a Comment