गोंधळात विधेयक सादर, सहा वाजता मतदान
Posted on Monday, March 08, 2010 by maaybhumi desk
राज्यसभेत राजद आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांच्या गोंधळातच महिला आरक्षण विधेयक सादर करण्यात आले असून विधेयकावर सायंकाळी सव्वा सहा वाजता मतदान घेतले जाणार आहे.
दरम्यान, विधेयक सर्वसंमतीने मंजूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न अजुनही सुरू असून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी या संदर्भात समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायम सिंह यादव व राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
तर पंतप्रधान मनमोहन सिंह यांनीही विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते अरुण जेटली यांच्याशी विधेयका संदर्भात चर्चा केली. या बैठकीत सीताराम येचुरी, डी.राजा आदी उपस्थित होते.
गोंधळ घालणा-या खासदारांवर नियंत्रणासाठी राज्यसभेत मार्शल बोलावण्यात आले होते. मात्र तरीही गोंधळ कमी न झाल्याने कामकाज सायंकाळी सहा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. सव्वा सहा वाजता विधेयकावर मतदान होणार आहे. या विधेयकाला पाठिंबा देणा-या आणि विरोध दर्शविणाया पक्षांनी आपल्या खासदारांना पक्षादेशाचे पालन करण्याचे आदेश (व्हीप) बजावले आहेत.
दरम्यान, सभापती हामीद अन्सारी यांच्याकडून विधेयकाच्या प्रती हिसकावून त्या फाडल्याबद्दल आणि सभापतींचा माईक उखडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल राजद खासदारांवर कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "गोंधळात विधेयक सादर, सहा वाजता मतदान"
Post a Comment