सेक्स टेप प्रकरणी रंजीताचा आत्महत्येचा प्रयत्न

Posted on Monday, March 08, 2010 by maaybhumi desk

चेन्‍नई

स्वामी नित्यानंद यांच्यासोबत एका सीडीमध्ये अनावृत्त अवस्‍थेत असलेल्या तमीळ अभिनेत्री रंजीताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. एका तमीळ वृत्तवाहिनीने केलेल्‍या स्‍टींग ऑपरेशनमध्‍ये ही बाब समोर आली असून त्यानंतर देशभर खळबळ माजली आहे.

नित्यानंद यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चेन्नई पोलिसांनी हे प्रकरण कर्नाटक पोलिसांकडेही देण्याचा निर्णय घेतला आहे. 

नित्यानंदचे कर्नाटकातही अनेक भक्त असून, बेंगलुरू पासून 30 किलोमीटर अंतरावरील बिदादीमध्ये त्यांचा मोठा आश्रम आहे. 

नित्यानंद यांच्या सोबत सीडीत दिसत असल्याने नाव खराब झाल्याने रंजीताने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे.  एका सैन्य अधिकाऱ्यासोबत रंजीताचा यापूर्वीच विवाह झाला होता. या अधिकाऱ्याने तिला घटस्फोट दिला आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "सेक्स टेप प्रकरणी रंजीताचा आत्महत्येचा प्रयत्न"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner