सपाने केंद्र सरकारचा पाठिंबा काढला
Posted on Monday, March 08, 2010 by maaybhumi desk
महिला आरक्षण विधेयकाचा तिढा कायम असून सत्ताधारी कॉंग्रेस व मित्रपक्षांसह प्रमुख विरोधी पक्ष भाजप व डावी आघाडी यांनी विधेयक मंजुरीसाठी कंबर कसली आहे. तर विधेयकाला विरोध करीत असलेल्या समाजवादी पार्टीने संपुआ सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली आहे. सपाने सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता.
राज्यसभेत महिला दिनाच्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक मंजुरीसाठी आणण्याचा सरकारचा प्रयत्न असून त्याला भाजप व डाव्या पक्षांनीही पाठिंबा दर्शविला असला तरीही समाजवादी पार्टीसह, लालू प्रसाद यादव यांच्या राजद व बसपाने त्यास विरोध केला आहे. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विधेयकास विरोध करणा-या या पक्षांनी जोरदार गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज सुरूवातीला चार वेळा तहकुब करण्यात आले.
विधेयकास विरोध तीव्र करण्यासाठी सपाने सरकारला बाहेरून दिलेला पाठिंबा काढून घेत असल्याची घोषणा केली आहे. समाजवादी पक्षाचे लोकसभेत 12 खासदार आहेत. पक्षाने संपुआ सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. सपाने पाठिंबा काढून घेतला असला तरीही सरकारकडे पूर्ण बहुमत असल्याने सरकारवर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही.
लेबले:
BJP,
breaking news,
congress,
cpm,
current news,
hot news,
india,
indian news,
latest news,
national news,
news,
top news
Subscribe to:
Post Comments (Atom)
No Response to "सपाने केंद्र सरकारचा पाठिंबा काढला"
Post a Comment