महिला आरक्षण विधेयकावर 'यादवी'

Posted on Monday, March 08, 2010 by maaybhumi desk


नवी दिल्ली

महिला आरक्षण विधेयकावर निर्माण झालेल्‍या वादामुळे राज्‍यसभा व लोकसभेचे कामकाज स्‍थागित करण्‍यात आले असून विधेयकाला विरोध करीत असलेल्‍या समाजवादी पार्टी, बसपा खासदारांच्‍या गोंधळामुळे राज्‍यसभेचे कामकाज चार वेळा स्‍थगित करण्‍यात आले. गोंधळ घालणा-यांना रोखण्‍यासाठी सभागृहात राज्यभेत मार्शल्‍स बोलावण्‍यात आले आहेत. विधेयकाला विरोध करणा-यांमध्‍ये मुलायम सिंह यादव सर्वांत आघाडीवर आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्‍या निमित्ताने महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देण्‍या संदर्भातील विधेयक आज
राज्यसभेत सादर केले जाणार होते. या विधेयकास सत्ताधारी संपुआसह भाजप व डाव्‍या पक्षांनीही पाठिंबा दर्शविला आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू होताच मुलायम सिंह यादव यांच्‍या समाजवादी पक्ष आणि लालू प्रसाद यादव यांच्‍या राष्‍ट्रीय जनता दलाच्‍या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभापतींसमोर आपला विरोध सुरू केला. सभापतींनी सदस्‍यांना शांत होण्‍याचे वारंवार आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करीत सपा खासदारांनी घोषणाबाजी सुरूच ठेवल्‍यानंतर कामकाज 12 वाजेपर्यंत त्‍यानंतर दुपारी 2 व नंतर तीन वाजेपर्यंत कामकाज स्‍थगित करण्‍यात आले.

दुपारी तीनला कामकाज सुरू होताच विरोधक अधिक आक्रमक होऊन राज्यसभा सभापतींच्‍या आसनासमोर येऊन घोषणाबाजी करू लागले. यावेळी त्‍यांनी सभापती हामीद अन्‍सारी यांच्‍या दिशेने विधेयकाचे कागद फाडून भिरकावले तसेच सभापतींना माईकही उखडण्‍याचा प्रयत्‍न केला. यामुळे सभापतींनी सभागृहात मार्शल्‍स बोलावले असून कामकाज चार वाजेपर्यंत तहकुब केले आहे.

विधेयकाला पाठिंबा देत असलेल्‍या भाजप व डाव्‍या पक्षांनी कुठल्‍याही स्थितीत विधेयक आजच सादर करण्‍याची मागणी लावून धरली असून समाजवादी पार्टी व राजदच्‍या खासदारांनी ते सादर न होऊ देण्‍याचा निर्णय घेतल्‍याने सभागृहात जोरदार रणकंदन सुरू आहे.

वाचण्‍यासारखे आणखीही काहीः




No Response to "महिला आरक्षण विधेयकावर 'यादवी'"

मायभूमीच्‍या ताज्या पोस्‍ट ईमेलने मागवा:

Delivered by FeedBurner